श्री भालचंद्र महाराज मठ

भालचंद्र महाराज मठ

कणकवली, सिंधुदुर्ग

१९२६ पासून एक पवित्र तीर्थक्षेत्र

परमहंस भालचंद्र महाराज ही एक देवत्व प्राप्त केलेली महान शक्ती आहे. आयुष्यभर तपसाधनेत मग्न असणारे आणि भक्तांची दुःखे निवारण करणारे भालचंद्र बाबा अखंड मौनधारी व दिगंबर अवस्थेत होते. बाबांच्या अखंड भक्तीने आणि समाधीस्थानाच्या दर्शनाने असंख्य भक्तांना बाबांच्या कृपेची प्रचिती येत आहे. बाबांच्या भक्तांमध्ये सर्व जाती, धर्म व पंथाचे भक्त आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबांचे भक्त आपणास कृपाछत्र लाभावे याकरिता परमहंस भालचंद्र बाबांच्या तपश्चर्यास्थान व समधीस्थानाच्या दर्शनाकरिता आश्रमात नेहमीच येत असतात.

1904

जन्म

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी श्री. परशुराम ठाकूर आणि सौ. आनंदीबाई या मात्यापित्यांच्या पोटी ८ जानेवारी १९०४ या वर्षी प.पू. भालचंद्र महाराजांचा जन्म झाला.

1926

कणकवलीत आगमन

बाबांचे काही जीवन मुंबईत गेले. लहानपणीच मातापित्यांचे देहावसान, मॅट्रीकच्या परिक्षेत आलेले अपयश, यामुळे निराशा आलेल्या बाबांच्या जीवनात अचानक वैराग्य प्राप्त झाले. त्या स्थितीत भालचंद्रबाबा गारगोटी, कोल्हापूर येथून दाणोली मार्गे १९२६ मध्ये कणकवलीत आले.

1930s

तपश्चर्या काळ

प्रारंभी जुन्या मोटारस्टँडवर किंवा श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिरापाशी ते एकटेच बसलेले दिसत. कधी एखाद्या झाडाच्या बेचक्यात ते बसलेले असत. कोणाशी बोलत नसत, हसत बसत, काही दिले, तर घेत नसत.

1977

महासमाधी

मुंबई-लालबाग येथे श्री हनुमान मंदिरात १६ डिसेंबर १९७७ या दिवशी अखंड हरिनामचा जयघोष चालू असताना रात्री १०.२५ वाजता भक्तांना दर्शन देत असतांनाच ते अनंतात विलीन झाले.

"जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे ।"

- प.पू. भालचंद्र महाराज संस्थान समिती

मुंबई-लालबाग येथे श्री हनुमान मंदिरात १६ डिसेंबर १९७७ या दिवशी अखंड हरिनामचा जयघोष चालू होता. रात्री १०.२५ वाजता भक्तांना दर्शन देत असतांनाच ते अनंतात विलीन झाले. बाबांचे पार्थिव कणकवली येथे आणले गेले. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला (१८ डिसेंबर १९७७) सध्याच्या आश्रमातील मध्य गाभार्‍यात वेदमंत्रघोषात समाधी देण्यात आली.

कणकवली येथील आश्रमात प.पू. भालचंद्र महाराज संस्थान समिती कार्यरत असून ती नोंदणीकृत आहे. या संस्थान समितीने जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे । या उक्तीप्रमाणे बाबांच्या भाविक भक्तांनी दिलेल्या देणग्यांचा योग्य विनियोग करून धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य हाती घेतले आहे.

दैनिक आरती आणि पूजा वेळापत्रक

  • पहाटे ५.३० काकड आरती, समाधी पूजन
  • दु. १२.३० महानैवैद्य
  • सायं. ६.०० श्रीं ची सायंपूजा
  • रात्री ८.०० महाआरती
  • रात्री ९.०० शेजारती